अक्कलकोट, दि. 12 : जगात दान देणारे व्यक्ती भरपूर आहेत. परंतु दान घेण्यासाठी असलेली अर्हता कमी असणारे लोक आहेत, अशी अनुमोल वाणी डॉ. चनमल्ला महास्वामी यांनी तोळनूर ता. अक्कलकोट येथे आत्मा सोशल फौंडेशन, अक्कलकोट या संस्थेचे उदघाटन करून व्यक्त केले.
अक्कलकोट तालुक्यातील तोळनूर येथे श्री गंगाधर मठा मध्ये श्री सिद्धारामेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तोळनूर इयत्ता १० वी परीक्षेत प्रथम कुमारी गुड्डे वाडी लक्ष्मी शिवानंद 85.80, द्वितीय कुमारी हरळय्या प्रियंका यशवंत 85.40%, तृतीय कुमार भागेश मल्लिकार्जुन 84.40% व १२ परीक्षेत प्रथम कुमारी स्वाती वीरभद्रप्पा उपासे 75.60 %, कुमार भीमाशंकर विश्वनाथ चानकोटी , त्रितीय कुमार गुरुराज मल्लिनाथ ककळे 70.15% तीन क्रमांक मिळविलेले विध्यार्थ्यांचे शाल श्रीफळ ,पुस्तक देऊन डॉ चनमल्ल महास्वामी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी दिव्यांग कलाकार राचय्या मुगळीमठ याना देश विदेशातील लोक भरपूर दान केल्यामुळे त्यांच्या वतीने तोळनुर गावातील इतर सर्व दिव्यांग मल्लम्मा आज्जी, कल्याणी रब्ब, सोमनाथ हडपद व्यक्तीना अन्न धान्य जीवनावश्यक वस्तू ,शाल ,श्रीफळ देऊन त्या दिव्यांग लोकाना आत्मबळ डॉ चनमल्ल महास्वामीजीं दिले आहेत.
तोळनूरचे प्रयोगशील शिक्षक शरणप्पा फुलारी, पत्रकार सोमशेखर जमशेट्टी, आधुनिक शेतकरी विठ्ठल विजापरे, शेतकरी मार्गदर्शक श्रीशैल रब्ब व स्पर्धा परीक्षा पुस्तक लेखक दानय्य कौटगीमठ या पाच तरुणांनी एकत्रित येऊन ९ ऑगस्ट क्रांतिदिनी निर्धार करून 10 ऑगस्ट मधल्या श्रावण सोमवारी सायंकाळी ५ वाजता तोळनूर येथे आत्मा सोशल फाऊंडेशन अक्कलकोटची स्थापना केली. या युवकांनी समाज उपयोगी कार्य करत पुढे जावे अशी आशीर्वाद श्री गंगाधर मठाचे मठाधिपती डॉ चनमल्ल महास्वामी यांनी दिले.