अक्कलकोट, दि. 12 : सोलापूर जिल्ह्याचे प्रथम आय पी एस अधिकारी काशिनाथ गायकवाड यांच्या 31व्या पुण्यस्मरण दिन  कोरोना महामारी मुळे घरगुती पद्धतीने साजरा करण्यात आले यावेळी के पी गायकवाड प्रतिष्ठानचे मार्गदर्शक  पुण्याचे पोलीस उपआयुक्त मा पौर्णिमा ताई गायकवाड यांनी मौजे सदलापूर येथील कुस्तीपटू धरती उर्फ राणी बनसोडे हिच्याशी संवाद साधले.

यावेळी राणी बनसोडे बोलताना योग्य प्रशिक्षण व खुराक मिळत नसल्याचे खंत व्यक्त केले व भविष्यात  आय पी एस होण्याचे इच्छा व्यक्त केली, लगेच ताईने पुण्यातील कुस्ती प्रशिक्षण केंद्राशी बोलून त्या चारही बहीण भावंडाना पुढील  प्रशिक्षण  व स्पर्धा परीक्षा अभ्यासा  साठी  पुण्याला येण्याची निमंत्रण दिले व पुढील आठवड्यात यांना पुण्यात बोलवण्यात आले.

के पी गायकवाड प्रतिष्ठान हे सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचे काम करत आहे. कुठल्याही जातीपाती विचार न करता सर्व सामन्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोध लढा के पी गायकवाड प्रतिष्ठान करीत आहे. कोरोना काळात अक्कलकोट तालुक्यातील पुणे येथे अडकलेल्या हजारो गरीब लोकांना धान्य किट वाटप करण्याचे काम प्रतिष्ठान माध्यमातून करण्यात आले आहे व वागदरी भागातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना वही पुस्तकसह शालेय साहित्य वाटप केले आहे, अशी माहिती संस्थापक राहुल बापू गायकवाड यांनी दिली

याप्रसंगी, के पी गायकवाड प्रतिष्ठान संस्थापक आयु.  राहुल बापू गायकवाड, आयु. शोभाबाई गायकवाड, सिद्धार्थ सोशल फौंडेशन अध्यक्ष आयु.कमलाकर सोनकांबळे, प्रा. राहुल रुही छात्र भारती संघटना राज्य संघटक सचिन बनसोडे, ए एम न्यूजचे रिपोर्टर चंद्रशेखर भांगे, अँड अनोल बनसोडे,निजप्पा गायकवाड, सरपंच प्रदीप जगताप, रफिक मुर्डी, सुनील सावंत, प्रकाश पोमाजी, संतोष पोमाजी, शाम बाबर,राज यादव,रत्नाकर गायकवाड, धरती बनसोडेचे कुंटुंबीय,उपस्थित होते.

 
Top