अक्कलकोट, दि. १२ : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार लॉकडाऊन माध्यमातून महाराष्ट्र सकट देशांमध्ये बेरोजगारी वाढत आहे उपासमारी वाढत आहे. यातून सर्व जनतेचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचबरोबर व्यापारी टपरीवाले नाव्ही यांचे दुकान चालू झाले पाहिजे, महाराष्ट्रातील लालपरी एसटी चालू झाली पाहिजे, त्याच्यावर महानगरपालिकेतील बस चालू झाल्या पाहिजे, एकंदरीत लॉकडाऊन ही प्रक्रियाच रद्द झाली पाहिजे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी ने डफली बजाओ आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.
तालुकाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन यशस्वी झाले. यावेळी रिपब्लिकन सेना व भारतीय लहुजी शक्ती सेना दलित पँथर व्यापारी संघटना रिक्षाचालक संघटना आदी संघटनाने यावेळी पाठिंबा दर्शवला आहे.
यावेळी रिपब्लिकन सेना तालुकाध्यक्ष संतोष बाळशंकर, भारतीय लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष वसंत देडे, माजी तालुकाध्यक्ष शिलामनी बनसोडे, भारिप नेते संदिप मडिखांबे, माजी तालुकाध्यक्ष गौतम मडीखांबे, नेहरू युवा केंद्र तालुका समन्वयक गौतम बाळशंकर, जिल्हा उपाध्यक्ष देवानंद अस्वले, शहराध्यक्ष आनंद मोरे शहर महासचिव राहुल मोरे, तालुका उपाध्यक्ष गुंडाप्पा अरेणकेरी, सम्यक विद्यार्थी आंदोलन तालुकाध्यक्ष रवी पोटे , कार्यकर्ते अशोक मोरे, श्याम बनसोडे दीपक बनसोडे रिपब्लिकन सेना नेते राजु गजधाने खाजप्पा आयवळे सहसचिव कामगार संघटनेचे जिल्हा सचिव सुरज अरखराव महादेव थोरे , आदी वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन सेना भारतीय लहुजी सेना कार्यकर्ते उपस्थित होते.