उमरगा : गो.ल. कांबळे 

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात यावी, या मागणीसाठी बुधवार दि. १२ रोजी येथील  एसटी स्टँडच्या आवारात हलगी नाद करीत जिल्हा प्रवक्ता रामभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अदोलन करण्यात आले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले असून त्यात असे म्हटले आहे की, २५ मार्च पासून राज्यात ताळेबंदी असल्याने नागरिकांना विविध समस्या भेडसावत आहेत.सामान्य माणसाचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.लहान व्यावसाईक यांची उपासमार होत आहे.त्यामुळे ही ताळेबंदी थांबवून सर्व वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी.एसटी बस सेवा ही सुरळीत करून ग्रामीण जनजीवन सुरळीत करण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रवक्ता रामभाऊ गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.चंद्रशेखर गायकवाड, जिल्हा कोषाध्यक्ष चंद्रकांत जोगे,वजीरपाषा सत्तार शेख,बाबुराव गायकवाड, शिवाजी गावडे,नेताजी गायकवाड, तुकाराम मम्माळे,तिप्पा बनसोडे,शरद कांबळे, कृष्णा जमादार, उमाजी गायकवाड, गौतम डिग्गीकर, उत्तम गायकवाड, संतोष सुरवसे, राघवेंद्र गावडे,विष्णू वाघमारे आदींच्या सह्या आहेत.या वेळी पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.एसटी डेपोचे आगार प्रमुख प्रसाद कुळकर्णी आणि त्याच्या कर्मचारी यांनी निवेदन स्वीकारले या अदोलनास दलित पँथर,सामाजिक संघटना, नाभिक संघटना आदी विविध संघटनेचा पाठिंबा असल्याचे रामभाऊ गायकवाड यांनी सांगितले.

राज्यातील टाळेबंदी मुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. दुकानदार दुकानाचे भाडे देऊ शकत नाही,वीजबिल भरू शकत नाही त्यामुळे हे सर्व वीजबिल माफ करावेत सामान्य नागरिकांना रोजी रोटीची समस्या भेडसावत असून त्याना आर्थिक मदत करावी,छोट्या व्यवसाईकांना आर्थिक मदत करून सर्व व्यवस्था सुरळीत करावी सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन सर्व व्यवसाय सुरळीत करावेत अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात इशारा वंचित आघाडीचे जिल्हा प्रवक्ता रामभाऊ गायकवाड यांनी दिला आहे. 


 
Top