उमरगा : गो.ल.कांबळे 

उमरगा एसटी आगारातील सेवानिवृत्त कर्मचारी नामदेव कांबळे यांचे सुपुत्र अशीत कांबळे यांनी नुकतीच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उज्वल यश संपादन केल्याने उमरगा आगाराच्या वतीने व विविध संघटनेच्या वतीने  बुधवारी दि १२ रोजी त्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रारंभी आगार प्रमुख प्रसाद कुळकर्णी यांनी प्रशासनाच्या वतीने सत्कार केला तद्नंतर कास्टाईब कर्मचारी संघटनेच्या वतीने मनोज कांबळे, मुकुंद कांबळे, नारायण कांबळे यांनी सत्कार केला.कामगार संघटनेच्या वतीने जयवंत जाधव,संजय मनकुरे यांनी सत्कार केला. कामगार सेनेच्या वतीने ही सत्कार करण्यात आला.

या वेळी व्ही.एस.बोळशेट्टी, राम वाकळे, टी.बी.जाधव, आर.बी.सुरवसे आदींनी सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मनकुरे यांनी केले. त आभार एस.एस.भालेराव यांनी मानले.

 
Top