खानापूर : बालाजी गायकवाड 

कृषी विभाग व आत्मा यांच्या सयुंक्त विद्यमाने तुळजापूर तालुक्यातील नांदुरी येथे कौशल्यावर आधारित काम करणाऱ्या मजुरासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रशिक्षणामध्ये कीड व रोग व्यवस्थापनामध्ये फवारणीची गरज,फवारणी कधी करायची,फवारणी करताना घ्यावयाची काळजी, फवारणी कोणत्या पद्धतीने करायची,किडींची ओळख कशी करायची,लेबर क्लेम कीटकनाशक द्रावण तयार कशा प्रकारे करायचे याचे सखोल मार्गदर्शन उपस्थित अधिकाऱ्यांनी केले.कीटकनाशक फवारणी करते वेळेस विषबाधा झाल्यास प्रथमोपचार कसा करायचा,फवारणी करताना अथवा शेतीकामे करताना सुरक्षा साधनांचा  कसा वापर करायचा,फवारणी नंतर कीटकनाशकाच्या रिकाम्या बाटल्या व पाकिटे यांची सुरक्षित विल्हेवाट लावणे यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले.

कीड व रोग व्यवस्थापनात जास्तीत जास्त जैविक, यांत्रिक पद्धतीचा अवलंब करावा असे त्यांनी यावेळी उपस्थित शेतक-यांना सांगितले.

या प्रशिक्षण कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथिल डॉ.श्रीकृष्ण झगडे,पिक संरक्षण तज्ञ लोंढे जाधव कृषी मंडळ अधिकारी वर्षा धनके,कृषी सहाय्यक यांच्यासह नांदुरी व परिसरातील शेतकरी शेतमजूर उपस्थित होते.

 
Top