लोहारा, दि. 12 : शहरातील प्रभाग क्र. 15 मधील फातिमानगर मध्ये कोरोनाचे 5 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता व नागरिकांच्या आरोग्यास धोका होवु नये म्हणुन स्थानिक नगरसेविका सौ. नाजमिन आयुब शेख व एजी बॉस ग्रुपच्या वतीने प्रभागात अर्सेनिक अल्बम 30 व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. तसेच त्यांना कामाशिवाय बाहेर पडु नये, बाहेर पडताना मास्क व सॅनिटायझर चा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग चे नियम पाळावे आदी सुचना प्रभागातील नागरिकांना देण्यात आल्या.

यावेळी शब्बीर गवंडी, एजी बॉस ग्रुप चे अध्यक्ष आयुब हबीब शेख, आशपाक शेख, जहीर खुटेपड, उबेद सुंबेकर, हारुन शेख यांच्यासह  प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

 
Top