तुळजापूर : कुमार नाईकवाडी
एस टी बसेस सह शहरातील सर्व सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सुरू करण्याच्या मागणी साठी बंचितबहुजन आघाडी च्या वतीने बुधवार दि. 12 ऑगस्ट रोजी येथील तहसिल कार्यालया समोर डफली बजाओ आंदोलन करण्यात आले.
तहसिलदार मार्फत यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनात वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली आहे. कोरोना संबंधित वीस टक्के लोकांना आरोग्य सुविधा पुरविण्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. माञ शंभर टक्के लोकांनवर निर्बंध घातल्याने ऐंशी टक्के लोकांवर आर्थिक संकट ओलाढले आहे. तरी कोरोना रोखण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करुन सर्व व्यवहार सुरु करावेत, सरकारने बस बेस्ट सेवा तुरुळक सुरु केल्याने लोकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याने सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सुर करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आले.
तुळजापुर तहसिल समोर केलेल्या "डफली बजाओ" आंदोलनात वंचितचे मिलींद रोकडे, सुरेश चौधरी, जीवन कदम, सुरेश मस्के, अलंकार बनसोडे, ॲड. सुनिल लोंढे, ॲड. दिनेश पाटील, ॲड. बबिता जानराव, धम्मशिल कदम, राकेश जेटीथोर, तुकाराम ईटकर, बबन डावकरे सह कार्यकते या सहभागी झाले होते.