लोहगाव, दि. 12 : तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथील शेतक-यांनी नविन डिपी मंजूर करण्यासाठी उपविभागीय कार्यकारी अभियंता तुळजापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे,
निवेदनात म्हटले आहे की, सन २०१७ साली मराठवाड़ा स्पेशल पॅकेज योजने अंतर्गत लोहगाव ता. तुळजापूर येथील खंडाळा प्रकल्पावरील डीटीसी 100 केएव्ही डिपीची मजुंरी मिळाली होती. परंतु तिन वर्षांचा कालावधी उलटला तरी अदयाप येथे डिपी बसविण्यात आले नाही. मंजूरी असून सुध्दा संबंधित विभागकडून डिपी बसविण्यात विलंब होत असल्याने शेतक-यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. खंडाळा प्रकल्पात भरपूर पाणीसाठा असूनही केवळ डिपी अभावी शेतक-यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यासाठी तात्काळ नविन डिपी मंजूर करावे, अशी मागणी शेतक-यांनी उपविभागीय कार्यालय अभियंता तुळजापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेबुब शेख, ग्रामपंचायत सदस्य निजाम शेख, मल्हारी कोकरे, सहदेव वाघमोडे, राचप्पा कलशेट्टी, बंडू फडताळे, ज्ञानेश्वर आर्जूनकर ,दत्ताञय वाळके, आपासू कलशेट्टी, महादेव कोकरे, विकास कोकरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.