नळदुर्ग, दि. 23 : विघ्नहर्त्यां गणरायाचे जिल्हाभरात स्वागत करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत तुळजापूर तालुक्यातील हंगरगा (नळ) येथे गावांत एक गाव-एक गणपती संकल्पना राबविण्यात आली. हंगरगा येथील महादेव मंदीरात शनिवारी श्री ची प्रतिष्ठापना करण्यात आली.
संसर्गजन्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील हंगरगा नळ या गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्याचा निर्धार करुन गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली. सामाजिक अंतर पाळून हंगरगा नळ येथील महादेव मंदिरात गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. यावेळी मंडळाचे संजय वाघोले, संतोष वाघोले, अमोल वाघोले, सिद्धु वाघोले, दादा मुदगडे, किरण चौगुले, संतोष चौगुले, समर्थ पाटील, सुनील कलशेटटी, संजय मगे, परमेश्वर आपशेट्टी यांच्यासह गावातील नागरीक उपस्थित होते.