उमरगा, दि. 17 : तालुक्यातील जि.प. प्रा. शाळा एकुरगावाडी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला प्रथमता गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन माजी सरपंच गुलाब मोरे यांनी केले. तर ध्वजारोहन माजी सैनिक बन्सी जाधव यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस पाटील विजय मोरे हे तर प्रमुख पाहुणे ग्रा.पं. सदस्य अनिल जाधव, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर औरादे, माजी शालेय समिती अध्यक्ष ज्योतीराम औरादे, माजी चेअरमन दिलीप पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष शिवाजी जाधव, नरेंद्राचार्य संस्थान तालुका युवा अध्यक्ष रमेश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन मु.आ. प्रणिता बिराजदार यांनी केले तर आभार शिक्षक वाय डी भोसले यांनी मांनले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रावणी औरादे, वंश मनोरे, प्रेम डावरगे, संदेश औरादे, धीरज पाटील, विष्णू जाधव, बाबा जाधव, आकाश जाधव, निलेश कांबळे आदींनी परिश्रम घेतले.