उमरगा, दि. 17 : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर श्री संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त रविवारी (१६) शहरातील दर्गा गल्ली येथील श्री संत सेना महाराज मंदिरात छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आले.

शहरातील श्री संतसेना महाराज व विठ्ठल रूक्मिनी मंदिरात दुपारी बारा वाजता श्रीच्या मूर्ती व प्रतिमेवर गुलाल व पुष्पवृष्टि अर्पण करण्यात आली. यावेळी ह.भ.प. भिम महाराज, विरनाथ काळे महाराज, श्री. संतसेना नाभिक संघटनेचे तालुकाध्यक्ष गुरूनाथ विभुते, शहराध्यक्ष नागेश सोमवंशी, उपाध्यक्ष विठ्ठल जवळगेकर, सतिश काळे, श्री. संत सेना महाराज मंदिर ट्रस्ट अध्यक्ष अविनाश काळे, सचिव जगदीश सुरवसे, बालाजी काळे, दुधाराम क्षिरसागर, संतोष काळे, आकाश काळे, शिवाजी मुळे, मुरलीधर काळे, शाम काळे, निलेश काळे,प्रताप मुळे आदीं उपस्थित होते.

   गुंजोटी, कलदेव निंबाळ्यात कार्यक्रम

श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी गुंजोटी येथे श्री स्वामी समर्थ मंदिरात साजरी करण्यात आली. प्रारंभी विश्वनाथ चौधरी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नाभिक समाजाचे अध्यक्ष  चंद्रकांत चौधरी, सिद्राम चौधरी, वसंतराव चौधरी, नागनाथ चौधरी, श्रीमंत चौधरी, भानुदास चौधरी, प्रभाकर चौधरी, व्यंकट चौधरी, सुधाकर चौधरी, मधुकर चौधरी, पांडुरंग चौधरी, लिंबाजी सूर्यवंशी, रविंद्र चौधरी,दिलीप चौधरी, बालाजी काळे, अशोक सुरवसे, नरसिंग चौधरी, शिवाजी चौधरी, तानाजी चौधरी, राहुल चौधरी आदी उपस्थित होते. दरम्यान नाभिक समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या हस्ते समाजबांधवाना सॅनिटायझर, मास्कचे वाटप करण्यात आले. कलदेव निंबाळा ग्रामपंचायतीमध्ये श्री संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी देविदास पावशेरे, कमलाकर पाटील, काकासाहेब सुरवसे, रमेश पाटील, बालाजी पाटील आदी उपस्थित होते.

 
Top