ताज्या घडामोडी

 

उस्मानाबाद, दि. 17 : जिल्हयात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून सोमवार दि. 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवानुसार 175 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉजिटीव्ह आला आहे. तर गेल्या चोवीस तासात 3 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 1 महिला व दो‍न पुरुषांचा समावेश आहे.  तसेच आज दिवसभरात 367 जण बरे होवून घरी परतले आहेत. जिल्हयात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 650 वर पोहचली आहे. यापैकी 2 हजार 98 जण बरे झाले असून 1 हजार 451 जणांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 101 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आज आढळलेल्या रुग्णांमध्ये उस्मानाबाद तालुक्यातील 37, तुळजापूर 21, उमरगा 27, कळंब 20, परंडा 14, लोहारा 5, भूम 51 जणांचा समोवश आहे. यामध्ये उस्मानाबाद शहरातील हनुमान नगर सांजा बायपास 2, बाबा ट्रान्सपोर्ट 1, रामनगर 4, जोशी गल्ली 1, काकडे प्लॉट 2, तांबरी विभाग 1, गणेशनगर 1, समता नगर 1, उस्मानाबाद तालुक्यातील अंबेजवळगा 1, वाणेवाडी 1, रुईभर 2, येडशी 1, तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा 2, आपसिंगा 2, नळदुर्ग 4, अणदूर 5, काटी 1, जळकोट 1, तुळजापूर शहरातील दत्‍त नगर 2, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय 1, उमरगा तालुक्यातील सुपतगाव 8, दगड धानोरा 3, गुगळगाव 1, कुन्हाळी 1, व्हंताळ 1, उमरगा शहरातील आरोग्य नगर 3, अजय नगर 1, भीमनगर 3, जुनी पेठ 1, लडवंती ता. बसवकल्याण (तपासणी उमरगा) 1, कळंब शहरातील सोनार गल्ली 3, बाबानगर 1, गांधीनगर 1, कळंब तालुक्यातील डिकसळ 7, येरमाळा 1, पिंपळगाव डोळा 3, सात्रा 4, परंडा तालुक्यातील पिस्तमवाडी 1, डोंजा 3, शेलगाव 3, शहरातील शिक्षक कॉलनी 2, लोहारा तालुक्यातील सास्तुर 1, जेवळी 1, मार्डी 1, लोहारा शहरातील 1, भूम शहरातील समर्थनगर 1, डॉक्टर कॉलनी अर्सोली 2, नागोबा चौक 6, विजयनगर 3, कसबा 2, शिवाजीनगर 5, दत्तनगर शाहू गल्ली 1, भूम तालुक्यातील हाडोंगरी 2, वालवड 1 यांचा समावेश आहे

तर रॅपिट अँटिजन चाचणीद्वारे बाधित झालेले रुग्ण पुढीलप्रमाणे : उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी 15, जिल्हा रुग्णालय 1, पाटोदा 1, सातेफळ 1, जिजाऊ क्वारंटाईन जेल 1, तुळजापूर शहरातील साळुंके गल्ली 2, तालुक्यातील ढेकरी 1, उमरगा तालुक्यातील यशवंतनगर मुरुम 1, संभाजीनगर मुरुम 1, उमरगा शहरातील गायकवाड एजेन्सी 1, आवटी प्लॉट 1, परंडा शहरातील मंगळवार पेठ 1, कुराड गल्ली 1, नृसिंह नगर 1, करमाळा रोड 1, मंडई पेठ 1, लोहारा पोलीस स्टेशन 1, भूम शहरातील मेन रोड 2, बागवान गल्ली 1, समर्थनगर 2, गांधी चौक 8, कुसूमनगर 1, झगडे गल्ली 1, ओंकार चौक 1, शाहू गल्ली 2, अंकारे गल्ली 1, कपिला डेअरी 1, रामहरी नगर 1, शिवाजीनगर 2, लक्ष्मी नगर 2, गालिबनगर 1, नगरपरिषद 1, भुम शहरातील 1 यांचा समोवश आहे.  

तसेच मृत्यू झालेल्यांमध्ये तुळजापूर तालुक्यातील वडगाव काटी येथील 60 वर्षीय पुरुषाचा सोलापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर जवळा ता. परंडा येथील 67 वर्षीय पुरुष याचा बार्शी येथे उपचारादरम्यान मृत्यू, इटकळ ता. तुळजापूर येथील 45 वर्षीय स्त्रीचा समावेश आहे. 







 
Top