अक्कलकोट, दि. 17 : केंद्रीय निवडणूक आयोग मान्यता प्राप्त नॅशनल स्पेशालिस्ट पार्टी संलग्न असलेल्या माहिती आधिकार व पत्रकार संरक्षण समिती श्री किरण किरात यांची अक्कलकोट तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
हि निवड माहिती आधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष अभिजित आपटे, राष्ट्रीय महासचिव गोविंद भावे, समस्त विभाग आघाड्यांचे मार्गदर्शक अमृताताई भंडारी व प्रकाश भारती यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष दिलीप कांबळे यांच्या संमतीने महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख कमलेश शेवाळे व पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष अमर बेंद्रे यांनी महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ. नमिता थिटे, उमेश काशीकर पश्चिम महाराष्ट्र सचिव गणेश बापु भोसले सोलापूर जिल्हाध्यक्ष यांनी निवडीचे पत्र दिले.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष अमर बेंद्रे, सौ. संध्या काळे, सौ. सुनीता देशपांडे, सोलापूर महिला शहराध्यक्षा प्रणोती जाधव, उपशहराध्यक्ष अनुजा कस्तुरे, सौ. संध्या काळ, सौ. श्वेता व्हनमाने, प्रा. रोहिणी कुलकर्णी, सौ. आरती काशीकर, सौ. सारीका कुलकर्णी, अतुल मोरे, धनराज जानकर, दिपक माळी, रविराज बनसोडे आदींनी अभिनंदन केले.