वागदरी : एस.के. गायकवाड 

पुनर्वसून क्षत्रातील पावसने ओढ दिल्याने माना टाकणाऱ्या खरीप हंगामातील पिकांना आश्लेषा नक्षत्रात सरते शेवटी गेल्या चार दिवसापासून पावसाची रिपरिप सुरू झाल्याने खरीप पिकांची आवकळा बदलली असून जीवदान आल्यागत पिकानी माना वर काढून मोराने फिसारा फुलवल्यागत आपल्या फांद्याचा विस्तार केला आहे. वागदरी व परिसरातील सर्व शेत शिवार हिरवागार शालू पांगरल्यागत दिसत आहे.

गत वर्षा पेक्षा सरते शेवटी म्रग नक्षत्राने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने सुखावलेला बळी राजा वाटेल ते पर्याय शोधून प्रसंगी कर्जबाजारी होऊन खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद मुग,तुर पिकांची कमी अधिक प्रमाणात पेरणी वेळेत केली. त्यातल्यात्यात गळीत आणि कडधान्य म्हणून उपयोगी पडणारे व शेतकऱ्यांना आधिक आर्थिक फायदा मिळवून देणारे पिक म्हणून उदयास आलेले सोयाबीन या पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात शेकऱ्यानी केली आहे. म्रग नक्षत्रा नंतरच्या काळात सर्व नक्षत्रामध्ये वेळोवेळी सलाईन लावल्यागत पाऊस आला. त्यामुळे कसी बसी पिके जमिनीवर तग धरून होती. ज्या शेतकऱ्याकडे  हंगामी पाण्याची सोय होती त्यांनी स्पिंक्लर द्वारे पाणी देवून पिके बऱ्यापैकी जगवली पण पाणी नसनारे शेतकरी मात्र आभाळा कडे बघत अंतर्गत मशागत, तननाशक ,किटकनाशक, टाँनिक वगैरे फवारांनी करून पावसाची वाट बघत होती.

आरद्रा नक्षत्रा मध्ये जरा बऱ्या पैकी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जमीनीवर पीक दिसू लागले. परंतु दोन्ही पूनर्वसु (पुक)  नक्षत्रात (धाकटा पुक,मोठा पुक) पावसाने ओढ दिल्याने जमीनीवरील पिके माना टाकण्यस सुरुवात केली होती पण आश्लेशा ( आशाडक्या) नक्षत्राने सरते शेवटी रिपरिप सुरु केल्याने पिकावर तेज आलेले दिसते. दि.१६आँगस्ट नंतर नक्षत्र बदलून मगा नक्षत्राला सुरवात होणार आहे. या नक्षत्रातील पावूसकाळ मोठा असतो असे म्हणतात. म्हणून या नक्षत्रातील पावसाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कारण पिक वाढी पुरता पाऊस पडला असला तरी सध्या पिकाना फुले, शेंगा, व दाने भरण्याची वेळ आहे. त्याकरीता पूरेशा पावसाची गरज आहे. शिवाय अध्याप जमिनीतून पाणी निघाले नाही. नदी ,ओढे,नाल्यात पाणी नाही. नळदुर्ग येथील बोरी धरणा सह तुळजापूर तालुक्यातील कोणतेच साठवण तलाव भरलेले नाही.त्यामुळे उर्वरित दिड महिन्यात सरते शेवटीचा पावूस मोठ्या प्रमाणात येण्याची गरज वाटते.


 
Top