नळदुर्ग, दि. 14 : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी पावन नगरीत श्रीक्षेत्र तुळजापूर येथील पुजाऱ्यांसाठी अन्नधान्याचे किट वाटप करण्यात यावे या मागणीचे निवेदन माजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या वतीने विद्यमान पालकमंत्री शंकरराव गडाख यांना देण्यात आले.
पत्रात असे नमूद केले आहे कि, दि. १७ मार्च २०२० पासून श्री तुळजाभवानी मंदिर बंद आहे.तुळजापूर येथील पुजारी, छोटे मोठे व्यापारी यांचे संपूर्ण अर्थकारण श्री तुळजाभवानी मंदिरावर अवलंबून आहे. त्यामुळे मागील सहा महिन्यापासून सर्व व्यवहार ठप्प असल्याने पुजारी व छोटे व्यापारी यांची उपासमार होत आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट कडून अशा सर्व पुजारी व व्यापारी यांना एक महिना पुरेल अशा प्रकाराची अन्नधान्याचे किट पुरवण्यात यावेत अशी मागणी माजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या निवासस्थांनी अणदूर येथे केली. या वेळी खासदार ओम प्रकाश निंबाळकर, आमदार कैलास पाटील, नगरसेवक सुनिल रोचकरी, सुनिल चव्हाण , बाबुराव चव्हाण आदि उपस्थित होते.