उमरगा : लक्ष्मण पवार
उमरगा तालुक्यातील नाईचाकूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने आठ कोटी रू.पिक यज्ञ कर्ज वाटप करण्यात आले.
यावेळी नाईचाकूर, भगतवाडी, चिरेवाडी, कोळेवाडी, बोरी, मातोळा, नारंगवाडी, नारंगवाडीचीवाडी,या गावातील शेतकऱ्यांना महाराष्ट्र ग्रामीण बँकेने आठ कोटी रू. पीक कर्ज वाटप केले आहे. कोरोणाच्या महामारीत शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे आधार म्हणून महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा नाईचाकूर चे शाखा अधिकारी देवकर एस. ए. यांनी शेतकऱ्यांना आठ कोटी रू.कर्ज वाटप केले आहे. मा.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातील थकित शेतकऱ्यांचे दोन लाखा रु. कर्ज माफ केले होते. बँकेतील थकीत कर्जदारचे दीड कोटी रूपयांची रक्कम माफ झाली होती ते दीड कोटी रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या कर्ज वाटप करण्यात आले व त्यांना वाढीव कर्ज वाटप करण्यात आले आहे. ७०० शेतकऱ्यांनी चालू बाकी केली होती त्या शेतकऱ्यांनी वाढीव कर्ज मागितले आहे त्यांना वाढीव कर्ज दिले आहे. ज्या राहिलेल्या शेतकऱ्यांना पूर्वीचे कर्ज जेवढे होते तेवढे कर्ज वाटप करण्यात आले आहे.
२०२०/२०२१ खरीप पीक कर्ज वाटप उद्दिष्ट पार केले आहे बँकेने आठ कोटी कर्ज वाटप केले आहे शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात आले आहे. जे कोणी शेतकरी राहिली असेल त्या सर्व शेतकऱ्यांना कर्ज देण्यात येईल. जे शेतकरी कर्जत चालू बाकी करतील त्या शेतकऱ्यांना खरिपाचा विमा भरला जातो.
महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा नाईचाकूर येथे २१/८/२०२० फायनान्शियल इन्शुरन्स कॅम्प अंतर्गत नाईचाकूर येथे फिरते एटीएम उपलब्ध करण्यात आले होते. शेतकऱ्यांना एटीएम चे महत्त्व नाई चाकूर येथील शाखाधिकारी देवकर यांनी समजावून सांगितले व शेतकऱ्यांना प्रत्यक्ष एटीएम मधून पैसे कसे काढायचे याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले व शेतकऱ्यांनी स्वतः एटीएम मधून पैसे काढले.
अटल पेन्शन योजना, पी .एम. किसान योजना, केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांच्या सर्व योजनेची माहिती शेतकऱ्यांना सांगण्यात आली. परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शाखाधिकारी देवकर एस .ए., प्रा.लहु कांबळे तंटामुक्तीचे उपाध्यक्षपदी गोविंदराव पवार, भूविकास बँकचे माजी शाखा अधिकारी दिलीप गायकवाड, ज्ञानेश्वर पवार,विठ्ठल पवार, श्रावण पवार, संजय कांबळे, नामदेव पवार महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
कोरोनाच्या महामारीत महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा नाईचाकूर बँकेने मला कर्ज दिल्यामुळे माझ्या अडचणीच्या काळात कर्ज उपलब्ध झाले व बँकेने शेतकऱ्याचा 2020 खरिपाचा विमा भरण्यासाठी आम्हा शेतकऱ्यांना पैसे नव्हते. बँकेत विमा भरला. आम्हा शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी बँकेने सोयाबीन या पिकाचा विमा भरला होता परिसरातील शेतकऱ्यांना भरपूर विमा आला होता व शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात विमा मिळाला आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा नाईचाकूर शेतकऱ्यांची हक्काची बँक झाली आहे. या बँकेने परिसरातील शेतकऱ्यांना आठ कोटी कर्ज वाटप केले आहे हे यावर्षी विशेष आहे.
- ज्ञानेश्वर माधव पवार, शेतकरी, नाईचाकूर