तुळजापुर : कुमार नाईकवाडी 

अतिशय पञिकुल परिस्थिती मध्ये वृतपञ विक्रेते ते संपादक असा अखंड प्रवास करीत आपली कारकिर्द करीत कै. मुरलीधर (बाबा) शिंगोटे यांचे दि.६ गुरुवार रोजी निधन झाले. अशा या थोर ज्ञानी लोकप्रिय संपादकास तुळजापुर तालुका पञकार संघाच्या व वृतपञ संघटनेच्या  वतीने दि.७ शुक्रवार येथील छञपती शिवाजी चौक येथील शासकीय विश्रामगृह येथे सोशल डिस्टन्स पाळुन भावपुर्ण श्रद्धाजंली वाहण्यात आली. 

यावेळी तुळजापुर तालुका पञकार संघाचे जेष्ट पञकार अंबादास पोफळे, उस्मानाबाद पञकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत कदम, उस्मानाबाद वृत पञ विक्रेता संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुरज बागल, पञकार गोविंद खुरुद, अँड जगदीश कुलकर्णी, गुरुनाथ बडुरे, संजय खुरुद, कुमार नाईकवाडी, किरण चौधरी, सचिन ताकमोघे, अजित चंदनशिवे, आनिल आगलावे, बाबा शेख, अमिर शेख, रोटरी क्लबचे दत्ता अंबर, प्रेस फोटो ग्राफर सतिश पवार, वृत पञ विक्रेते संघाचे सचिव गणेश भातुसे, बाळासाहेब प्रयाग, संजय कुलकर्णी,  गणेश गायकवाड, अकबर शेख, नितीन गायकवाड, संतोष गायकवाड, दादा नन्नवरे, दिलीप जळके आदीसह पञकार बांधव, वृत पञ विक्रेते उपस्थित होते.

 
Top