नळदुर्ग, दि. 07 : दैनिक पुण्यनगरी वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक मुरलीधर शिंगोटे यांना नळदुर्ग येथे पत्रकारांच्यावतीने शुक्रवार दि. 7 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता पत्रकार भवन या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी वृत्तपत्र विक्रेते भारत यादगिरे, भाजपाचे शहराध्यक्ष पद्माकर घोडके, पत्रकार भगवंत सुरवसे, शिवाजी नाईक, तानाजी जाधव, विलास येडगे, किशोर दबडे, सुहास येडगे, श्रीनिवास भोसले, उत्तम बणजगोळे, अमर भाळे, निजाम शेख, लतीफ शेख आदीजण उपस्थित होते
