नळदुर्ग, दि. 07 : संसर्गजन्य कोरोना आजार तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात पसरत चालल्याने ग्रामस्थांतुन चिंता व्यक्त केली जात आहे. त्यात शुक्रवार (दि. 7) रोजी जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार तुळजापूर तालुक्यात सर्वाधिक 48 रुग्ण पॉजिटीव्ह आले आहेत.
तुळजापूर तालुक्यात आज पॉजिटीव्ह आढळलेल्या रुग्णांची गावनिहाय माहिती पुढीलप्रमाणे आहे.
तुळजापूर शहरात 18, देवसिंगा येथे 3, अणदूर 7, चिवरी उमरगा 1, नळदुर्ग 3, बारुळ 1, दहिटणा 1, काटी 1, मसला 1, कसई 7, तीर्थ 1, आपसिंगा 2, जळकोट येथील 2 रुग्णांचा समावेश आहे.
तर जिल्हयात 130 आढळलेल्या रुग्णांपैकी उस्मानाबाद तालुका 18, उमरगा 27, कळंब 28, परंडा 7, लोहारा 1, तुळजापूर 48, वाशी 1 रुग्णांचा समावेश आहे.
तुळजापुर तालुक्यातील नळदुर्ग येथे प्रारंभी पॉजिटीव्ह आढळलेले 14 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सध्या 24 रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती नळदुर्ग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जानराव यांनी दिली.

