तुळजापुर : कुमार नाईकवाडी
येथील कमानवेस प्रभाग क्रं. ८ मध्ये कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आढळल्याने न.प. प्रशासनाच्या वतीने तो भाग सील करण्यात आला होता. त्यामुळे तो भाग कंटेटमेंट झोन झाल्याने या प्रभागाचे नगसेवक रणजीत इंगळे यांच्यावतीने त्या प्रभागात राहणाऱ्या नागरीकांना घरोघरी जाऊन भाजीपाला, दुध, सँनिटायझर आदीसह जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी पिंटु अणदुरुकर आदीसह नगरसेवक रणजीत इंगळे मिञ मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
