तुळजापुर : कुमार नाईकवाडी

येथील नगरपालिकेच्या वतीने दि.२१ शुक्रवार रोजी शासनाच्या धोरणानुसार रोजंनदारी  कर्मचारी यांना नियमित सेवेत समाविष्ट करुन  जिल्हाधिकारी यांनी 18 ऑगस्ट 2020 रोजी पारित केलेल्या समावेशन मंजुरी आदेशानुसार  न. प. चे कर्मचारी रवि मस्के, शिवाजी सोनवणे,अस्तिक साखरे आदी कर्मचार्‍यांंना नियमीत सेवेत समाविष्ट करुन त्यांना तुळजापुर न.प. मधुन कार्यमुक्त करुन त्यांचा निरोप समारंभ करुन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या. त्यांचे समावेशन मुरूम नगर परिषद मध्ये शासन नियमा नुसार झालेले आहे.

 सदर कर्मचारी यांचा नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्ष सचिन रोचकरी, नगरसेवक बापुसाहेब कणे,विशाल रोचकरी,विजय कंदले आनंद कंदले, निलेश रोचकरी व न प चे  अधिक्षक वैभव पाठक आदीसह कर्मचारी आदीच्या उपस्थित न.प.दालनात निरोप देण्यात आला. 

 तसेच अनुकंपा तत्त्वावर बापूसाहेब रोचकरी यांची तुळजापुर नगर परिषदे मध्ये लिपीक या पदावर  नियुक्ती करण्यात आली.  त्यांचेही नियुक्ती आदेश देण्यात आले.

 
Top