तुळजापुर : कुमार नाईकवाडी
आंतरराष्ट्रीय महिला खो-खो खेळाडु कु. सारिका काळे यांना क्रिडा क्षेत्रातील मानाचा सर्वोच्च अर्जुन पुरस्कार मिळाल्या बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने त्यांचा तुळजापूर येथे सत्कार करण्यात आला.
वयाच्या अकराव्या वर्षापासून क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सारीका काळे यानी अनेक राज्य राष्ट्रीय स्पर्धामध्ये भाग घेत संघाला सतत विजय मिळवुन दिला आहे. त्यांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याने उस्मानाबाद जिल्ह्याच्या गौरवात भर पडली आहे. क्रिडा क्षेत्रात नैपुण्यामुळे अर्जुन पुरस्कार मिळाल्याने तुळजापुर तालुका रा.काँ वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, गोकुळ शिंदे, धनंजय पाटील, खंडू जाधव, विजय सरडे, बबन गावडे, शहराध्यक्ष अमर चोपदार, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंखे, युवक जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम, युवक शहराध्यक्ष शरद जगदाळे, तालुकाध्यक्ष व्यापारी आप्पासाहेब पवार, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष तोफिक शेख, गणेश नन्नवरे, मनोज माडजे, दिनेश क्षिरसागर, समर्थ पैलवान, रोहित चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.