तुळजापुर : कुमार नाईकवाडी
तीर्थक्षेञ तुळजापूर येथील श्रीतुळजाभवानी मंदीर परिसरात असणाऱ्या अतिप्राचीन रणसम्राट गणेश मंडळाच्या श्री गणेश मुर्ती ची दि.२२ शनिवार रोजी पारंपरिक पद्धतीने प्रतिष्ठापना उस्मानाबाद जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम व तालुका पञकार संघाचे सचिव कुमार नाईकवाडी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्राणप्रतिष्ठापना विधीचे पौराहित्य निरोत्तम जेवळीकर यांनी केले.
संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर यंदा रणसम्राट तरुण मंडळाने साधेपणाने श्रीगणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने साधेपणाने श्रीगणेश मुर्तीची प्रतिष्ठापना सोशल डिस्टंन्स पाळुन करण्यात आली.
यावेळी रणसम्राट मंडळाचे दत्ता क्षिरसागर मनोज गायकवाड विक्रम शिंदे, सुरेश शिंदे, संतोष गंगणे, महेश क्षिरसागर, प्रसन्न जितकर, विवेक शिंदे, सुधीर छञे आदीसह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.