नळदुर्ग, दि. २२ : तुळजापुर तालुक्यातील होर्टी येथील जय हनुमान गणेश मंडळाच्या श्री गणरायाच्या मुर्तीची शनिवार दि.२२ शनिवार रोजी शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करत प्रतिष्ठापना करण्यात आली.
संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर यंदा होर्टी येथील जय हनुमान गणेश मंडळाने साधेपणाने श्रीगणेश मुर्तीची प्रतिष्ठापना मंडळाचे आधारस्तंभ महादेव भातागळे यांच्या हस्ते सोशल डिस्टंन्स पाळुन करण्यात आले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष अनिल सगर, उपाध्यक्ष महादेव सगर, सचिव ईश्वर सगर, सद्स्य रामेश्वर सगर, दत्ता सगर, योगेश घोडके, अमोल बोधे, चैतन्य सगर, अनिल काळे आदी उपस्थित होते.