काटी : उमाजी गायकवाड
स्वातंत्र्य दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा झाली. यामध्ये उस्मानाबाद जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस उपनिरीक्षक दगुभाई शेख यांना पोलीस खात्यातील गुणवत्तापुर्ण विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उस्मानाबाद जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागातील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पोलीस दगुभाई शेख यांचा नुकताच तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रहिवासी तथा शेळगाव (ता.बार्शी) हायस्कूल मधील सहशिक्षक बाळासाहेब किसन साळुंके यांच्या हस्ते उस्मानाबाद येथे शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक दगुभाई शेख, सहशिक्षक बाळासाहेब साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.