नळदुर्ग, दि. 23 : "आपला उत्सव - आपला अभिमान" या संकल्पनेतून नळदुर्ग शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घरगुती "श्रीगणेशोत्सव"आरास स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
कोरोनाच्या संकटामुळे सार्वजनिक गणेशोत्सव हा साधेपणाने साजरा होत आहे. त्याअनुषंगाने मनसेच्यावतीने नळदुर्ग शहरात घगुती श्री गणेशोत्सव आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वजण घरात मोठ्या उत्साहात गौरी-गणपतीचा सण साजरा करीत असून घरामध्ये गणेशोत्सवाची आरास, आकर्षक सजावट केलेली असते. त्याचा एक फोटो आपल्या नावासह ९८६०२२२६३१, ७५०७६३०६६१, ७४९९९८३४७३, ८६०५३००८४१ या वाट्सअप क्रमाकावर पाठवून या घरगुती गणेशोत्सवाच्या आरास स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचे आवाहन नळदुर्ग शहर मनसेच्यावतीने करण्यात आले आहे.
स्पर्धेचे नियम :-
१) स्पर्धकानी आपले पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, पत्ता व स्पर्धेसाठी पाठविणार आहेत तो फोटो व्यवस्थित दिसेल असा पाठवावा.
(२) स्पर्धा हि दि. २९ तारखे पर्यंत राहील.
(३) स्पर्धेसाठी आमच्याकडे नाव नोंदवायची आवश्यकता नाही फक्त फोटो पाठवावेत. (४) स्पर्धेचे पारितोषिक वितरण विजेत्या स्पर्धकाच्या घरी येऊन दिले जाईल.
(५)स्पर्धेसाठी एकच फोटो पाठवावा.
(६)पारितोषिक वितरण हे दि-३० तारखेला होईल.
प्रथम,द्वितीय ,तृतीय पारितोषिक(आकर्षक भेट वस्तु व सन्मानचिन्ह)