उस्मानाबाद :- रोटरी क्लब उस्मानाबादच्या वतीने रोटरी क्लबचे अध्यक्ष अमर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तथा रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांच्या पुढाकाराने नगराध्यक्ष नंदू राजे निंबाळकर, नगरसेवक उदय निंबाळकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कोरोना कालावधीत सर्वोत्तम व उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या येथील नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांना कोरोना कोरोना योध्दा पुरस्काराने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येऊन त्यांना एक महिना पुरेल एवढे किराणा साहित्याचे किट व गरम वाफ घेण्यासाठी वेफोराईझर मशिनचे वाटप करण्यात आले.
येथील नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांमार्फत कोरोना कालावधीत स्वत:चा जीव धोक्यात घालून व स्वत:ची काळजी घेऊन मृत पावलेल्या 85 व्यक्तींचे अंत्यसंस्कार शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करीत करण्यात आले. त्यांच्या कार्याची दखल घेत व सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून येथील रोटरी क्लबच्या वतीने नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांचा कोरोना योध्दा पुरस्काराने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. व त्यांना एक महिना पुरेल एवढे किराणा साहित्याच्या किटचे व गरम वाफ घेण्यासाठी वेफोराईझर मशिनचे वाटप करण्यात आले.
यावेळी सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलताना नगराध्यक्ष नंदु (भैय्या) राजेनिंबाळकर यांनी नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करत नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच रोगाचे निदान लवकर होण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले व नगरपालिका करत असलेल्या उपाय योजनांची माहिती दिली. तसेच रोटरी अध्यक्ष अमर देशमुख यांनी रोटरी क्लब उस्मानाबादच्या वतीने कोरोना संसर्गाच्या कालावधीत करत असलेल्या कार्याची माहिती दिली.
यावेळी सत्काराला उत्तर कर्मचाऱ्यांनी कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव ठेवून माणुसकीच्या नात्याने सर्व विधी पार पाडल्याचे भावना व्यक्त केल्या.
यावेळी नगराध्यक्ष नंदू (भैय्या)राजेनिंबाळकर, नगरसेवक उदय निंबाळकर, रोटरी अध्यक्ष अमर देशमुख, सचिव इंद्रजीत आखाडे, रो. धनंजय वाकुरे,रो.प्रदीप मुंडे, रो.नितीन तावडे,रो.सुरज कदम,रो. कुणाल गांधी, रो.राजेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.