नळदुर्ग, दि. 21 : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एस.टी. बससेवा सुरू करण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात बस सुरु झाली. म्हणून एस.टी.कर्मचारी व प्रवासी यांचे स्वागत करण्यात आले. 

यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष मारुती बनसोडे, आर.एस.गायकवाड, माजी सैनिक अंकुश लोखंडेयांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम नळदुर्ग बस स्थानकात संपन्न झाला. यावेळी एस.टी. कर्मचारी चालक भोगे व वाहक कांबळे यांचा वंचितच्या वतीने पुष्पहार घालून स्वागत करुन पेढा भरविण्यात.

याप्रसंगी वंचितचे अंकोल वाघमारे, कवि गोविंद भंडारे, वागदरी शाखेचे अध्यक्ष सुदर्शन बनसोडे, मुकेश धाडवे, नितिन बनसोडे, गुणवंत जमादार, सुरज कांबळे , आकाश बनसोडे, श्रीशैल सुर्यवंशी, अभिषेक उबाळे, राहूल, कांबळे प्रमोद गायकवाड यांच्यासह प्रवाशी उपस्थित होते. या वेळी जिल्हाध्यक्ष मारुती बनसोडे, आर. एस.गायकवाड , अंकुश लोखंडे, अंकोल वाघमारे, कवि गोविंद भंडारे यांची भाषणे झाली. 

 
Top