बेंबळी, दि. 11 : कोरोना संसर्गजन्य आजारामुळे संचार बंदी असल्यामुळे याचा फटका मूर्तीकार बांधवांना बसला आहे गणेश उत्सवात मोठ्या मूर्तीवर प्रशासनाचे निर्बंध घातल्याने मोठ्या मूर्तीपासून बहूतांश मिळकत असते त्यावर बंदी घातल्याने त्यांच्या उदर निर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे.
अनेक वर्षापासून परंपरागत पिढ्यान पिढ्या चालू असलेला हा व्यवसाय उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी गावातील बालाजी कुंभार यांनी तीन पिढ्यापासून हा व्यवसाय जपला आहे. 40 गावातून घरगुती गणेश मूर्तीसह गणेश मंडळाचे कार्यकर्ते तसेच सार्वजनिक गणेश मंडळ हे बेंबळीतून गणेश मुर्ती खरेदी करतात तसेच एक लक्ष रू ची उलाढाल असलेल्या व्यवसायावर कोरोना संसर्गजन्य आजाराचे सावट असल्याने दिसत आहे. काही अवधीवरच गणेशाचे आगमन होत आहे. त्यात मजूर कामासाठी मिळत नाहीत तसेच भाव वाढ झाल्याने मुर्तीकार बांधवांवर खूप मोठे संकट ओढविले असल्याचे दिसून येत आहे.
पीयूपीत 100 रू दर वाढ,कलर 100 रू ची वाढ,रबर साचा 450 रू वाढ मजूर कामगाराचा अभाव मोठ्या मूर्ती वर निर्बंध या समस्याचे विदारक चिञण मुर्तीकार बांधवासमोर असल्याचे दिसून येत आहे प्रत्येक मंडळाची आॅर्डर असायची आॅर्डर देण्यासाठी अनेक मंडळाची वर्दळ असायची पण आता कारागिराच्या दुकानासमोर शुकशुकाट असल्याचे ही निर्दशनास येत आहे मजूर मिळत नसल्याने कारागिर स्वतः घरातील सदस्या सोबत काम करत आहेत मोठ्या मूर्तीची ऑर्डर नसल्याने कारागिर बोलविले नाहीत त्याच बरोबर मोठ्या मूर्तीकाराचे यंदा काम बंद आहे. कोरोना आजारामुळे मूर्तीकारासमोर समस्यांचे सावट पसरले आहे.
प्रतिक्रिया :
मोठ्या मूर्तीवर प्रशासनाने निर्बंध घातल्याने उदरिनर्वाहाचा प्रश्न भेडसावत आहे तर तिन पिढ्यापासून परंपरागत असलेल्या व्यवसायावर मोठे संकट आले कारागिर कुटूंबावर उपास मारीची वेळ आली त्यातच भाव वाढ झाल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
बालाजी कुंभार, मूर्तीकार - बेंबळी