नळदुर्ग, दि. 11 : नळदुर्ग शहर व परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नळदुर्ग येथे कोविड सेंटर सुरु करा, अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे आरोग्यमंत्री यांना ई-मेल द्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सद्य परिस्थितीत कोरोना रुग्ण हे जिल्हा रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय तूळजापुर येथे उपचार घेत आहेत. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्या ठिकाणी बेड शिल्लक नाहीत. अशा परिस्थितीत नळदुर्ग शहर व परिसरातील वाढती रुग्णांची संख्या पाहता नळदुर्ग येथे कोविड सेंटर सुरु करावे, जेणेकरुन रुग्णांना तातडीने उपचार मिळतील, असे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, शहराध्यक्ष अलीम शेख, सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष रमेश घोड़के आदींच्या स्वाक्ष-या आहेत.