नळदुर्ग, दि. 11 : येथील भारतीय स्टेट बँकेच्या नळदुर्ग शाखेमध्ये ग्राहकाच्या सोयीसाठी पासबुक खतावणीची मशीन बसवावी, तसेच टोकन पद्धत सुरु करावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने बँकेच्या व्यवस्थापकांना देण्यात आले आहे. 

निवेदनात असे म्हटले आहे की, नळदुर्ग येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेमध्ये पासबुक खतावन्यासाठी ग्राहक तासन-तास ताटकळत उभे असतात. यामधे जेष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, नोकरदार वर्ग, शेतकरी, व्यापारी, अनेकजण पासबुक खतावन्यासाठी आपला वेळ बैंकेच्या ग़ैरसोयीमुळे वाया घालवत आहे. शाखेमध्ये पासबुक खतावनीची मशीनची सोय झाल्यास ग्राहकाचा वेळ ही वाचेल आणि त्रास ही होणार नाही. तसेच जे ग्राहक पैसे भरन्यासाठी अथवा काढण्यासाठी येतात. तेही रांगेत तासन-तास उभे असतात. या ग्राहकाच्या सोयीसाठी शाखेमध्ये टोकन पद्धत सुरु करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी मनसेचे जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, शहराध्यक्ष अलीम शेख, सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष रमेश घोड़के, मनविसे शहराध्यक्ष सुरज चव्हाण, सचिव भाऊराज कांबळे, विभाग अध्यक्ष यासीन शेख आदि उपस्थित होते.

 
Top