उस्मानाबाद, दि. 11 : लोहारा येथील पंचायत समिती सभागृहात रानभाजी महोत्सवाचे आयोजन दि.११ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन व पाहणी पंचायत समिती सभापती हेमलता रणखांब व गटविकास अधिकारी अशोक काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या महोत्सवात २७ भाज्यांचा समावेश करण्यात आला होता. यावेळी निसर्गात स्वतःहून उगवलेल्या रानभाज्यांचे आहारातील महत्व व रानभाज्यामध्ये उपलब्ध असलेल्या अन्नद्रव्याचे प्रमाण यासंदर्भात लोहारा तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी विविध प्रकारच्या २७ रानभाज्यांचे नमुने हे प्रदर्शनामध्ये ओळख आणि त्यांचे महत्व सांगण्यासाठी ठेवण्यात आले होते.
रानभाज्यांची ओळख हिप्परगा येथील कृषी सहाय्यक दिपक जाधव यांनी करुन दिली तर नियोजन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक कैलास पवार यांनी केले होते.यावेळी कृषी अधिकारी सचिन चेंडकाळे, मंडळ कृषी अधिकारी जालिंदर माळी, विस्तार अधिकारी किरण निंबाळकर, सर्व कृषी सहाय्यक, कृषी सखी व शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविक तावशीगडचे कृषी सहाय्यक शैलेश जट्टे यांनी तर सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार श्रीनिवास पाटील यांनी मानले.