नळदुर्ग, दि. ११ : दिवसेंदिवस वाढत असलेल्या संसर्गजन्य कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वडाचा तांडा ग्रामपंचायत (होर्टी) ता.तुळजापूर येथे गाव पातळीवर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून गावातील सर्व ग्रामस्थांचे शारीरिक तापमान व शरीरातील ऑक्सिजन तपासण्यासाठी मंगळवार दि. 11 ऑगस्ट थर्मल स्क्रिनिंग व ऑक्सिजन प्रमाण तपासण्यात आले. यावेळी सरपंच सौ. विजया चव्हाण, उपसरपंच सौ. निमाबाई राठोड, ग्रा. पं. सदस्य लखन चव्हाण, चांगुणा चव्हाण, ललिता चव्हाण, आशा कार्यकर्ती बबिता राठोड, ग्रामरोजगार सेवक विकास चव्हाण, मुख्याध्यापक बालाजी भोसले, ग्रामसेवक सी. आर. अवया आदीजण उपस्थित होते.
दरम्यान, यापुर्वी अनेकदा ग्रामपंचायतच्यावतीने जंतुनाशक फवारणी करुन मास्क सॅनिटायझरचे वाटप केले आहे. ग्रामस्थानी महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन सरपंच सौ. चव्हाण यांनी केले आहे.