जळकोट : मेघराज किलजे

मौजे खुदावाडी (ता.तुळजापूर) येथे ग्रामपंचायतच्या वतीने कोरोना विषाणू गावात पसरू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सरपंच, उपसरपंच व  ग्रा.प.  सर्व सदस्य, कर्मचारी, यांच्या सहकार्यातुन गावात पंपच्या सहाय्याने सोडियम हायड्रोक्लोरिक फवारणी करण्यात आली. 

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून ग्रामपंचायत खुदावाडीच्या वतीने विविध यंत्राच्या सहाय्याने फॉगिग मशीनद्वारे   किंग  फॉग औषध फवारणी करण्यात आली व आरोग्य उपकेंद्र खुदावाडी येथे २४ तास आरोग्य सेवा देण्याची सोय करण्यात आली. त्यामुळे कोरोना विषाणू गावामध्ये होऊ नये म्हणून गावातील सर्वानी काळजी घ्यावी व सर्व जनतेनी शासनाच्या कायदेशीर निर्णयाची खबरदारी घ्यावी.  कोरोना विषाणू पसरवू नये म्हणून सोडियम हायड्रोक्लोरिक फवारणी करण्यात आली.

यावेळी ग्रामसेवक महेश मोकाशे, सरपंच शरद  नरवडे, उपसरपंच  पांडुरंग  बोंगरगे, ग्रा. प. लिपिक भास्कर व्हलदुरे, पांडुरंग व्हलदुरे, मनोहर मोलगडे आदी उपस्थित होते.


 
Top