उस्मानाबाद, दि. 07 :

शिल्पा अनंतकुमार लांडगे, वय 30 वर्षे, रा. काजळा, ता. उस्मानाबाद यांनी दि. 06.07.2020 रोजी आत्महत्या केली. वाहन खरेदीसाठी शिल्पा यांनी माहेरहुन 6 लाख रुपये आणावे असा तगादा सासरकडील लोक- आनंदकुमार लांडगे (पती), विलास लांडगे (सासरा), प्रमिला (सासु), दिपक व सुधीर (दिर), हर्षदा व प्रतिभा (जावा) यांनी लावला होता. 

त्याकरीता नमूद लोक शिल्पा हिचा सन- 2012 पासुन वेळोवेळी शारिरीक- मानसिक छळ करत होते. सतत होणाऱ्या या छळाला कंटाळुन शिल्पा यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या सुमित अरुण रणखांब, रा. अजिंठानगर, उस्मानाबाद यांच्या प्रथम खबरेवरुन नमूद 7 व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 306, 304 (ब), 498 (अ), 323, 504, 34 अन्वये गुन्हा दि. 07.08.2020 रोजी नोंदवला आहे.

 
Top