तुळजापुर : कुमार नाईकवाडी
शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त ऑनलाईन निबंध स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा शुक्रवार दि. ७ ऑगस्ट रोजी तालुक्यातील हंगरगा (तुळ) येथे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व उस्मानाबाद-कळंबचे आमदार कैलास दादा पाटील यांच्या हस्ते पारितोषिक देऊन विदयार्थ्यांना गौरवण्यात आले.
तसेच हंगरगा (तुळ) येथील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यर्थ्यांना पुष्पगुच्छ व प्रशिस्तपञ, तुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रगंणात वृक्षारोपण करण्यात आले आले.
यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई वडणे, युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे, शिवसेना तालुकाप्रमुख तुळजापूर जगन्नाथ गवळी, तुळजापूर शहरप्रमुख सुधीर कदम,अर्जुन आप्पा साळुंखे, सोशल मिडीया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, कालिदास सुरवसे, रोहित नागनाथराव चव्हाण, सोशल मिडीया सिंदफळ विभागप्रमुख सिद्राम कारभारी, सरपंच मधूकर भंडारी, उपसरपंच दशरथ चौगुले, शाखाप्रमुख शंकर गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य हणमंत शिंदे, ग्रामसेवक मनोज चौगुले, अनिल हंगरगेकर, गोरोबा चव्हाण, तानाजी गव्हाणे, बाशू सय्यद, किरण चव्हाण, रंगनाथ हंगरगेकर, बळवंत हंगरगेकर, जयराज क्षीरसागर, संदीप जाधव, किशोर चव्हाण, शुभम गव्हाणे, सौरभ चव्हाण, पंकज शेळके, चेतन चव्हाण, रणजित गव्हाणे, विश्वास शिंदे, लिंबराज चव्हाण, नागनाथ चव्हाण, दिपक भिसे, विनोद गायकवाड तसेच शिवसैनिक ,ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
