तुळजापुर : कुमार नाईकवाडी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तुळजापूर शाखेच्या वतीने मंगळवार दि. १८ ऑगस्ट रोजी येथील श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या समस्या व मागण्या पूर्ण करण्यासाठी प्राचार्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद केले आहे की, चालू शैक्षणिक वर्ष २०२० -२१ मधील प्रवेश शुल्क ३०% सरसकट कमी करावी आणि फी च्या किमान १०% रकमेवर चालू शैक्षणिक वर्षाला विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा. कोरोणा ची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क ३ टप्प्या ऐवजी ५ टप्प्यात भरण्याची मुभा देण्यात यावी, तसेच मागील सत्रातील १५ मार्च २०२० पासून लायब्ररी फी, जीमखाना फी, प्रयोगशाळा फी, वसतीगृह फी, सार्वजनिक समारंभ फी यांच्यासह इतर फी व डेव्हलपमेंट फी विद्यार्थ्यांना परत देण्यात यावी व जो पर्यंत महाविद्यालय सुरू होत नाही तो पर्यंत विद्यार्थ्यांकडून ही फी घेऊ नये, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांना अद्यापही मिळाली नाही.यामुळे विद्यार्थ्यांची समस्या लक्षात घेऊन त्यांची शिष्यवृत्ती त्यांना लवकरात लवकर मिळवून द्यावी, सध्या महाविद्यालय मध्ये विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एटीएमची सुविधा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी अभाविपचे प्रदेश सहमंत्री अंकिता पवार, जिल्हा महाविद्यालय प्रमुख ऋषिकेश साळुंके, शहर मंत्री पृथ्वीराज महामुनी, शिवांजली बोधले, अथर्व पाटील, राज भोरे, प्रतिक अंबुरे, ओमकार पवार, पृथ्वीराज पाटील, सुरज कावरे यांच्याह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.