तुळजापुर : कुमार नाईकवाडी 

येथील वेताळनगर भागात राहणाऱ्या एका ३८ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार दि. ८ ऑगस्ट रोजी  घडली. 

याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील वेताळनगर भागात राहणाऱ्या गणेश कृष्णा जगदाळे वय वर्षे ३८ यांने दि. ८ शनिवार रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातील पञ्याच्या लोखंडी आडुस साडीने अज्ञात कारणामुळे गळफास लावुन आत्महत्या केली. 

मयताचे सासरे आमरुषी संकपाळ रा.गौडगाव ता.बार्शी जि.सोलापूर यांच्या खबरीवरुन तुळजापुर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे. मयत गणेश जगदाळे याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ आई असा परिवार आहे. त्याच्यावर सायंकाळी येथील घाटशीळ स्मशान भुमीत अंत्य संस्कार करण्यात आले.


 
Top