नळदुर्ग : मानमोडी ता. तुळजापूर येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस   जिल्ह्याचे खासदार  ओमप्रकाश राजेनिंबाळकर , उस्मानाबादचे आमदार  कैलास  पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. 

प्रारंभी मान्यवरानी   नारळ, बदाम आणि शेवगा याचे वृक्षारोपण केले. तसेच ड्रीपद्वारे  करण्यात आलेल्या भाजीपाला निर्मिती प्लांटचे उद्घाटन केले. तसेच संपूर्ण शाळेतील वृक्षांना ड्रीप द्वारे पाणी देत असलेले पाहून कौतुक केले. त्यानंतर प्रत्येक वर्गात जाऊन डिजिटल वर्ग ,ई लर्निंग, प्रोजेक्टर नव्याने निर्मित केलेले एअर कुलर पाहून माहीती जाणुन घेतली.  मुख्याध्यापक कार्यालय पाहून तेथील वस्तूंची रचना, थोर पुरुषांचे डिजिटल फोटो, संगणकाची रचना, अद्यावत शाळेचे रेकॉर्ड पाहून,त्यानी कौतुक केले.

  त्यानंतर शाळेच्या प्रांगणात गावातील जनतेला विविध प्रश्न, समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा आदेश प्रशासनातील सबंधतीना सुचन  दिल्या. यावेळी   जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण , गणेश सोनटक्के ,सरपंच गोपाळ सुरवसे,उप सरपंच मोरे ,सत्यवान  सुरवसे , भरत सुरवसे,विस्तार अधिकारी सर्जे ,केंद्रप्रमुख अंगुले ,परिसरातील सर्व शिक्षक ,शालेय व्यवस्थापन समिती  अध्यक्ष ,उपाध्यक्ष व सदस्य आणि शाळेचे मुख्याध्यापक विक्रम पाचंगे ,रमेश दूधभाते ,रामकृष्ण मोहिते ,अशोक राठोड, श्रीमती सुचेता चव्हाण आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top