नळदुर्ग, 20 : कोरोना ड्युटी संपवून घराकडे दुचाकीवरुन परतणा-या शिक्षकाचा  स्विफ्ट कारच्या धडकेत अपघातात मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि. 20 ऑगस्ट रोजी तुळजापूर-लातूर महामार्गावरील वडगाव (लाख) ता. तुळजापूर येथे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

भीमाशंकर शिवहार व्होर्टे (वय 50 वर्षे, रा. बारुळ, ता. तुळजापूर) असे मयत शिक्षकाचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, नागझरी तांडा ता. तुळजापूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक व्होर्टे हे कार्यरत असून कोरोना नियंत्रण कक्षामधील कामकाज संपवून ते दुचाकी (क्रं.एमएच 25 झेड 7292) वरुन घराकडे परतत असताना तुळजापूर-लातूर मार्गावरील वडगाव लाख पाटीच्या पुढे स्वीफ्ट डीझायर ((क्रं. एमएच 24 व्ही 9288)) या गाडीने पाठीमागुन धडक दिली. यामध्ये भीमाशंकर व्होर्टे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूबद्ल बारुळ गावासह तालुक्यात हळहळ व्यक्त आहे. व्होर्टे यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, आई-वडील, भाऊ, बहीणी असा परिवार आहे.



 
Top