तुळजापूर : कुमार नाईकवाडी

आंतराष्ट्रीय खो-खो खेळाडू सारिका काळे यांना क्रीडा क्षेत्रातील मानाचा सर्वोच्च अर्जुन पुरस्कार मिळाल्याबद्दल भाजपा तालुकाध्यक्ष संतोष बोबडे यांच्या हस्ते गुरुवारी सत्कार करण्यात आला.

वयाच्या अकराव्या वर्षापासून क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या सारिका काळे हिने अनेक राज्य, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये संघाला सतत विजय मिळवून दिला आहे. तिला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याने उस्मानाबाद जिल्ह्याच्या गौरवात भर पडली आहे. क्रीडा क्षेत्रातील नैपुण्यामुळे राज्य शासनाच्या शिवछत्रपती राज्यस्तरीय पुरस्कारासह अन्य पुरस्कारानेही तिचा सन्मान करण्यात आला. शासनाने तिचा गौरव करत तालुका क्रीडा अधिकारीपदी नियुक्ती केली. सारिता सध्या तुळजापूर तालुका क्रीडाधिकारी म्हणून कार्यरत आहे. 

सारिका काळे हिला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यामुळे तुळजापूर येथे भाजपाचे तुळजापूर तालुकाध्यक्ष संतोष बोबडे यांचा हस्ते आज सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती पिंटू मुळे, विजय शिंगाडे, गुलचंद व्यवहारे, नागेश नाईक, आनंद कंदले, सुहास साळुंके,नारायण ननावरे, शिवाजी बोधले, विकास मलबा, संजय खुरुद, सागर कदम, इंद्रजित साळुंके, प्रसाद पानपुढे, आदी मान्यवर उपस्थित होते.

 
Top