उस्मानाबाद, दि. 20 :
उस्मानाबाद जिल्हयात आज गुरुवार दि. 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 153 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 67 जण बरे होवून घरी परतले आहेत.
जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 4 हजार 62 झाली आहे. यातील 2 हजार 374 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 111 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1 हजार 423 जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
आज आढळलेल्या पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये उस्मानाबाद तालुक्यातील 60, तुळजापूर 21, उमरगा 18, कळंब 10, परंडा 25, लोहारा 8, भूम 1, वाशी तालुक्यातील 10 जणांचा समावेश आहे.