तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
तुळजापुर तालुक्यातील मंगरूळ जवळील रूपा पेट्रोल पंपावर ग्राहकाला एटीएम कार्डवर पेट्रोल मिळत नसल्याने ग्राहकाची हेळसांड होत असुन ग्राहकामधुन संताप व्यक्त होताना दिसत आहे.
देशासह राज्यामध्ये कोरोनाचा कहर वाढतच चालल्याने तसेच अनेक मॉल, मोठी दुकाने, पेट्रोल पंप अशा ठिकाणी मशीनची आवश्यकता असल्याने नागरीक रोख पैशाने व्यवहार न करता क्रेडीट/एटीएम कार्डचा वापर करून वस्तु खरेदी करताना दिसत आहेत .परंतु काही खत दुकाने, पेट्रोल पंपावर मशीन असुनही ग्राहकाला रोख पैशाची मागणी करूनच वस्तु दिली जात असल्याचे दिसून येत आहे.
तुळजापुर तालुक्यातील मंगरूळ जवळील पेट्रोल पंपावरही असाच प्रसंग संभाजी ब्रिगेडचे कृष्णा नवगिरे याना आला. या रूपा पेट्रोल पंपावर ते पेट्रोल भरण्यासाठी गेले असता तिथे त्याना एटीएम कार्ड घेऊन आम्ही पेट्रोल देत नसल्याचे सांगण्यात आले व आमच्याकडे मशीन उपलब्ध नसल्याचे तेथील कामगाराकडुन सांगण्यात आल्याचे नवगिरे यानी सांगितले. पेट्रोल पंपावर कोणत्याही प्रकारचा सुचनाफलक न लावता आमच्या पंपावर आम्ही रोख पैशानेच पेट्रोल देतो येथे कार्ड वगैरे चालत नसल्याचे सांगितले तसेच मालकाचा फोन नंबर मागितला असता फोन नंबर देण्यास नकार दिला. कठीण परीस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीकडे पैशे नसल्यास व एटीएम/ क्रेडीट कार्ड असल्यास जर अशा पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळत नसेल तर नागरीकांना त्रासाला सामोरे जावे लागणार असुन अशा पेट्रोल पंपावर कार्डवर पेट्रोल मिळत नसल्याने ग्राहकाची हेळसांड होत असुन महत्वाच्या कामावर पाणी फिरत असल्याने ग्राहकांमधुन संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने अशा पेट्रोल पंप चालकांना एटीएम/ क्रेडीट कार्ड मशीन ठेवण्याच्या सुचना द्याव्यात अशी मागणीही संभाजी ब्रिगेडचे कृष्णा नवगिरे यानी तुळजापुर लाईव्हशी बोलताना केली आहे.