उमरगा, दि. 20 : लखन किरण चव्हाण, रा. महादेव गल्ली, उमरगा यांची शेजारी राहणारी मावशी ही दि. 15.08.2020 रोजी 10.00 वा. गावी गेली होती. ही संधी साधुन अज्ञात चोरट्याने त्यांच्या दाराचे कुलूप तोडून घरातील एलईडी टीव्ही, टेबल फॅन, गॅस सिलींडर असा एकुण 35,000/-रु. चा माल चोरुन नेला होता. हा प्रकार काल दि. 19.08.2020 रोजी सकाळी 11.00 वा. लखन चव्हाण यांच्या लक्षात आला. यावर त्यांनी उमरगा पोलीसांकडे धाव घेउन गु.र.क्र. 290/2020 भा.दं.सं. कलम- 454, 457, 380 नुसार नोंदवला आहे. गुन्हा तपासात उमरगा पोलीसांनी वेगाने चक्रे फिरवून गोपनीय खबरेवरुन दि. 20.08.2020 रोजी संशयीतास ताब्यात घेउन त्याच्या ताब्यातून नमूद मुद्देमाल जप्त केला आहे.