तुळजापूर, दि. 20 : येथील व्यापारी संघटना व छावा संघटना यांच्यावतीने नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांना निवेदन देण्यात आले.
गणपती उत्सव शनिवारी असल्यामुळे शहरातील सर्व दुकाने शनिवारी जनता कर्फ्यू असल्यामुळे बंद असतात येणारा गणेशोत्सव महालक्ष्मी उत्सव उत्सव लक्षात घेता घरामध्ये प्रत्येक घराघरात लक्ष्मी व गणेशोत्सव चालू असतो ते उत्सव व सणवार व्यवस्थित पार पडावेत, याकरिता तुळजापुरातील व्यापाऱ्यांची दुकानाची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 7 करावी अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.