लोहारा दि.१० : येथील वसंतदादा पाटील हायस्कूल सलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात सोमवार दि. १० ऑगस्ट रोजी इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. 

  इयत्ता १० वी परीक्षेत तालुक्यातून व शाळेतून सर्वप्रथम आलेली विद्यार्थिनी कु.यशश्री श्रीकांत मोरे (९७.२०%),द्वितीय कु. नेहा उद्धव सोमवंशी(९४.२०%), तृतीय कु.साक्षी उमेश जवादे (९२.६०%),व कु.रेणुका संतोष सूर्यवंशी(९२.६०%) तर कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील प्रथम विद्यार्थिनी कु. मुळे स्वरांजली प्रकाश(७४.००%) द्वितीय कु. काडगावे रोहिणी राम(७३.०८%) तृतीय कु.चिद्रे आकांक्षा किशोर(७२.६२%), वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक कु.गोरे निकिता नानासाहेब(८२.१५%) द्वितीय क्रमांक कु. कडबाने मनीषा व्यंकट (७६.३०%) तृतीय क्रमांक कु.पालकर प्रगती शाम(७५.२३%), कला शाखेतून प्रथम क्रमांक कांबळे शिवम सतिश(७९.८४%), द्वितीय क्रमांक चव्हाण पृथ्वीराज भागवत(७७.२३%) तृतीय क्रमांक शेख इम्रान मेहबूब(७२.६१%) या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

     

महाविद्यालयातून सर्व प्रथम येणारी कु.गोरे निकिता नानासाहेब या विद्यार्थिनीस प्रा.काळे पी.जी.यांच्यावतीने १००१ रुपये,तसेच मराठी विषयात सर्व प्रथम येणारी कु. मुळे स्वरांजली प्रकाश या विद्यार्थिनीस प्रा.बुवा व्ही.एम.यांच्यावतीने १००१,संरक्षण शास्त्र विषयात प्रथम आलेला विद्यार्थी कांबळे शिवम सतीश यास प्रा.शिंदे एस.डी. यांच्यावतीने ५०१ रुपयेचे पारितोषिक देण्यात आले.

  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीमती पाटील यु व्ही होत्या.प्रा.सुनील बहिरे, प्रा. बुवा व्ही.एम.,प्रा.आष्टोकर आर सी,श्री जाधव बी. एल. यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा.शिंदे डि. व्ही.,प्रा.काळे पी.जी.,प्रा.साठे डि.आर.,प्रा. कांबळे जी.एम., प्रा.सोमवंशी यु.व्ही.,प्रा.कलमे व्ही.टी.,बालाजी ईरूदे,जाधव डी.आर.,श्रीकांत मोरे,पांढरे एन. एस., तसेच इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,विदयार्थी, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनवडे डि व्ही,तर आभार प्रदर्शन प्रा. शिंदे एस.डी.यांनी मानले.

 
Top