उस्मानाबाद, दि. 10 : महाराष्ट्र राज्य एकल प्राथमिक शिक्षक सेवा संच उस्मानाबाद शाखेच्या वतीने सोमवारी उस्मानाबाद जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन देवून कोरोना कक्षातून प्राथमिक शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची मागणी केली आहे.
या निवेदनावर दिपक हजारे, विश्वास शिंदे, पवन सुर्यवंशी, शिवाजी पाटील आदींच्या स्वाक्ष-या आहेत. निवेदनाची एक प्रत उस्मानाबाद जि.प. शिक्षण विभागास देण्यात आली आहे.
