तुळजापूर, दि. 10 : तालुक्यात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून त्या पार्श्वभूमीवर संपुर्ण तुळजापूर तालुक्यामध्ये कडक संचारबंदी लागु करण्यात यावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने तहसीलदार मार्फत उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.

निवेदनात नमूद केले आहे की, तुळजापूर तालुक्यात गेल्या 10 दिवसापासुन संसर्गजन्य कोरोना महामारीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच कोरोना बाधितांची संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात तालुक्यातील जनतेस कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोना या माहामारीचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी तालुक्यामध्ये कडक संचारबंदी लागु करणे गरजेचे आहे. तरी संपुर्ण तुळजापूर तालुक्यामध्ये कडक संचारबंदी लागु करण्यात यावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका उपाध्यक्ष जुबेर शेख यांच्या कडून करण्यात आली आहे. यावेळी निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका उपाध्यक्ष जुबेर शेख व युनुस सय्यद यांची स्वाक्षरी आहे.


 
Top