नळदुर्ग, दि. 10 : होर्टी, ता. तुळजापूर येथील अर्जून नामदेव राठोड यांची राष्ट्रीय बंजारा मिशन संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हा संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड प्रदेशाध्यक्ष बाबुसिंग राठोड यांनी केली अहे.
या निवडीबद्दल अर्जून राठोड यांचे वडाचा तांडा होर्टी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. विजया चव्हाण, उपसरपंच सौ. निमाबाई राठोड, ग्रा पं सदस्य लखन चव्हाण, सौ चांगुणा चव्हाण ,सौ.ललिता चव्हाण ,किसन राठोड ,रेवाप्पा राठोड,शिवाजी राठोड,बाबू राठोड, रणजित चव्हाण ,प्रेमदास राठोड,विजय राठोड,राहुल राठोड,नंदू पवार ,सुनील जाधव,जयराम राठोड आदींनी अभिनंदन केले आहे.
